Socialize

Type Here to Get Search Results !

Zilha Parishad Bharti

जिल्हा परिषद भरती अपडेट्स

जिल्हा परिषदेत दोन हजार एकोणवीस आली एकूण 13 हजार 514 जागांसाठी जाहिरात देण्यात आली होती परंतु त्यावेळेस महापरीक्षा पोर्टल कडून अर्ज करण्यात आले होते जवळजवळ चार ते पाच लाख उमेदवारांनी त्या मध्ये अर्ज केलेले होते रंतु महापरीक्षा पोर्टल हे वादाच्या भोवर्‍यात सापडले आणि त्या कारणास्तव महापरीक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी विद्यार्थ्यां तर्फे जोर धरू लागली आणि


त्यानंतर सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद केले महापरीक्षा पोर्टल बंद झाल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या सरळ सेवेच्या भरतीप्रक्रिया किंवा परीक्षा घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची कंपनी त्यावेळेस नव्हती त्या कारणास्तव MahaIt तर्फे नवीन टेंडर मागवून कंपन्यांची निवड करण्याची प्रक्रिया मार्चपासून सुरू करण्यात आली त्यानंतर महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगात कोरोनाचे थैमान सुरु झाले आणि त्यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली जवळजवळ सात ते आठ महिन्यानंतर कंपन्यांची निवड झाली एकूण अगोदर चार कंपन्यांची निवड झाली होती त्यानंतर एक कंपनी मेसर्स कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने कोर्टात जाऊन अपील करून त्या ठिकाणी त्यांना सुद्धा मंजुरी मिळाली आहे आणि अशी एकूण मिळून आता पाच कंपन्या या वेगवेगळ्या विभागातील सरळ सेवेच्या भरती प्रक्रिया राबवणार आहे 


ही झाली संपूर्ण भाग ची प्रोसेस आता आपण लेटेस्ट प्रोसेस कडे येणार आहोत इतर भागांकडे तोरणाचे थैमान महाराष्ट्र राज्यात अगदी वाढले होते पहिली लाट दुसरी लाट आणि या लाटेत रुग्ण संख्या अगदी झपाट्याने वाढत होती आणि त्या कारणास्तव आरोग्य कर्मचाऱ्यांवर त्याचा जास्त होता कारण मित्रांनो महाराष्ट्र राज्यात जवळजवळ दोन लाखांपेक्षा जास्त जागा या रिक्त आहेत आणि त्या जागा भरण्याची प्रक्रिया लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने सुरू करावी अशी मागणी सुद्धा त्यावेळी सुरू करण्यात आली होती त्या कारणास्तव महाराष्ट्र शासनाने आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया राबवली 28 फेब्रुवारी रोजी दोन हजार एकोणावीस ती प्रक्रिया होती ही प्रक्रिया पार पडल्यानंतर लगेचच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घोषणा केली होती की आम्ही येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये बारा हजार जागा भरणार आहोत.


म्हणून तर त्या जागा भरण्यासाठी मित्रांनो अर्ज सुद्धा आता भरून घेतलेले आहेत आणि येत्या 25 आणि 26 सप्टेंबर 2019 रोजी ची परीक्षा होणार आहे त्याचप्रकारे मिरवणूक 2019 झाली तुमच्याकडून जिल्हा परिषद भरती मध्ये एकूण एकवीस पदांसाठी अर्ज भरण्यात आले होते परंतु आरोग्य विभागाशी संबंधित जी पाच पदे आहेत आरोग्य सेवक आरोग्य सेवक पुरुष फवारणी कर्मचारी आरोग्य सेविका औषध निर्माता आरोग्य पर्यवेक्षक तरी या पाच पदांची मित्रांनो परीक्षा राबवण्यात येणार आहे आणि या परीक्षा राबवण्यासाठी कंपन्यांची सुद्धा निवड झालेली आहे आणि तुमच्या परीक्षेची सुद्धा तारीख आलेली आहे परीक्षेच्या संपूर्ण नियोजन खालील प्रमाणे आहे 


याच दरम्यान मराठा आरक्षणाचा सुद्धा प्रश्न निर्माण झाला होता आणि आता तुम्हा सर्वांना माहिती आहे मराठा आरक्षण हे माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आलेले आहे आणि त्यामुळे 2019 मध्ये SEBC या प्रवर्गासाठी स्वतंत्र जागा होत्या तर त्या जागा या खुल्या प्रोग्राम मध्ये गेल्यात त्याचबरोबर अपंग विद्यार्थ्यांच्या बाबतीत आरक्षणामध्ये सुद्धा बदल झाला आणि त्या कारणास्तव दिव्यांग विद्यार्थ्यांच्या किंवा अपंग विद्यार्थ्यांच्या जागा सुद्धा वाढल्या आणि त्यामुळे वाढलेल्या च्या जागा आहेत त्या जागांसाठी नव्याने अर्ज मागविण्यात येत आहेत या संपूर्ण कार्यक्रमासाठी 1 सप्टेंबर पासून सुरुवात झालेली आहे आणि 21 सप्टेंबरपर्यंत शेवटची मुदत आहे तरी ज्या विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करायचे असतील ते विद्यार्थी नव्याने सुद्धा अर्ज करू शकतात परंतु अर्ज करतेवेळी तुम्हाला एक म्हणजे खुल्या प्रवर्गातून अर्ज करावा लागेल स्पेशल प्रवर्गासाठी जागा नाहीत जसे एससी एसटी या प्रवर्गासाठी स्वतंत्ररीत्या जागा नाहीत फक्त खुल्या प्रवर्गासाठी जागा असल्या कारणास्तव सर्वच विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून अर्ज करता येईल त्याचबरोबर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुद्धा जागा या ठिकाणी आहेत आणि जे दिव्यांग विद्यार्थी असतील ते संपूर्ण दिव्यांग विद्यार्थी या ठिकाणी नव्याने अर्ज करू शकतात अर्ज करण्याची प्रोसेस 1 सप्टेंबर पासून 21 सप्टेंबर पर्यंत आहे त्याचबरोबर ज्या उमेदवारांनी 2019 मध्ये SEBC या प्रवर्गासाठी अर्ज केले होते त्या उमेदवारांना विकल्प द्यायचे आहेत त्यांच्यासाठी दोन विकल्प आहेत एक विकल्प म्हणजे ईडब्ल्यूएस दुसरा विकल्प म्हणजे खुला प्रवर्ग त्यांच्या इच्छेप्रमाणे या दोन्ही विकल्प पैकी ते कुठलाही एक विकत निवडू शकतात परंतु जर त्या विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस प्रवर्ग निवडला तर त्यांना ईडब्ल्यूएस हे प्रमाणपत्र कागदपत्र तपासणीच्या वेळी दाखवावे लागेल आणि जर त्या उमेदवाराने आपल्या प्रवर्गामध्ये विकल्प दिला तर त्या उमेदवारांना एक्स्ट्रा ची जी फी असेल ती भरावी लागणार आहे संपूर्ण प्रोसेस सुरू आहे आणि या विद्यार्थ्यांसाठी 1 सप्टेंबर पासून 14 सप्टेंबर पर्यंत विकल्प नोंदवण्याची मुदत आहे संपूर्ण जिल्हा परिषदेचा जो कार्यक्रम आहे तो तुम्हाला खाली देत आहे 



संपूर्ण जिल्हा परिषद भरतीची जाहिरात उपलब्ध करून दिली आहे

सूचना :- खालील संपूर्ण माहिती हि २०१९ मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांच्या माहितीसाठी आहे बाकी सविस्तर माहिती लवकरच येथे उपलब्ध करून दिली जाईल म्हणून दररोज वेबसाईटला भेट देत राहा

जिल्हा परिषद भरती 2019 

महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषदेत 13 हजार 514 जागांसाठी मेगा भरती

एकूण पदांची संख्या :- 13514

जिल्हा परिषद भरती 2019 मध्ये आलेल्या जाहिराती मधील संपूर्ण पदांची नावे 

अनु. नं. 

पदांचे नाव इंग्रजी मध्ये 

पदांचे नाव मराठी मध्ये

1

Junior Engineer Civil

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

2

Junior Engineer Electrical

कनिष्ठ  अभियंता (विद्युत)

3

Junior Engineer Mechanical

कनिष्ठ अभियंता  (यांत्रिकी)

4

Extension Officer Panchayat

विस्तार अधिकारी (पंचायत)

5

Gram Sevak Contractual

कंत्राटी ग्रामसेवक

6

Health Supervisor

आरोग्य पर्यवेक्षक

7

Pharmacist

औषध निर्माता

8

Laboratory Technician

प्रयोगशाळा तंत्रज्ञ

9

Health Worker Male

आरोग्य सेवक (पुरुष)

10

Health Worker Male Seasonal  Spraying 

आरोग्य सेवक (पुरुष) हंगामी फवारणी कर्मचारी

11

Health Worker Female

आरोग्य सेविका

12

Extension Officer Agriculture

विस्तार अधिकारी (कृषि)

13

Civil Engineering Assistant

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

14

Live Stock Supervisor Animal Husbandry

पशुधन पर्यवेक्षक

15

Senior Assistant Account

वरिष्ठ सहाय्यक (लेखा)

16

Supervisor Icds Nomination

पर्यवेक्षिका अंगणवाडी

17

Senior Assistant Ministerial

वरिष्ठ सहाय्यक (लिपिक)

18

Junior Assistant Ministerial

कनिष्ठ सहायक (लिपिक)

19

Junior Accounts Officer

  कनिष्ठ लेखा अधिकारी

20

Junior Mechanic 

कनिष्ठ यांत्रिकी

21

Extension Officer Statistical 

विस्तार अधिकारी (सांख्यिकी) 




शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):


पदाचे नाव

मिळणारा पगार

शैक्षणिक पात्रता व अनुभव 

कनिष्ठ अभियंता स्थापत्य

वेतन बँड 9300-34800 ग्रेड पे 4300

स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षांचा पाठ्यक्रम) किंवा समतुल्य अर्हता धारण करून असतील अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल.

कनिष्ठ अभियंता विद्युत

वेतन बँड 9300-34800 ग्रेड पे 4300

विद्युत अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षांचा पाठ्यक्रम) किंवा समतुल्य अर्हता धारण करून असतील अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल.

कनिष्ठ अभियंता यांत्रिकी

वेतन बँड 9300-34800 ग्रेड पे 4300

यांत्रिकी अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षांचा पाठ्यक्रम) किंवा समतुल्य अर्हता धारण करून असतील अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल.

विस्तार अधिकारी पंचायत

वेतन बँड 9300-34800 ग्रेड पे 4200

संविधिक विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल परंतु, ग्रामीण समाज कल्याण व स्थानिक विकास कार्यक्रमाचा तीन वर्षाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

कंत्राटी ग्रामसेवक

------------------

उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा

 किंवा 

समतुल्य अहर्ता परीक्षेत किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण 

किंवा

शासनमान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका तीन वर्षांचा अभ्यासक्रम 

किंवा 

शासनमान्य संस्थेची समाज कल्याण ची पदवी बीएसडब्ल्यू 

किंवा

माध्यमिक शाळा प्रमाणपत्र 

किंवा समतुल्य अर्हता आणि कृषी विषयाची पदवी का दोन वर्षाचा अभ्यासक्रम धारण करीत असतील अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल मात्र कृषी विषयाची पदवी किंवा उच्च अहर्ता धारण करणाऱ्या किंवा समाज सेवेचा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल आणि संगणक हाताळणी वापराबाबत माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेल्या परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील 

आरोग्य पर्यवेक्षक

वेतन बँड 9300-34800 ग्रेड पे 4200

ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा बारा महिन्यांचा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारांमधून नामनिर्देशन द्वारे नेमणूक करण्यात येईल 

औषध निर्माता

वेतन बँड 5200-20200 ग्रेड पे 2800

औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषध शास्त्र अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार 

प्रयोगशाळा तंत्रज्ञ

वेतन बँड 9300-34800 ग्रेड पे 4200

जाने मुख्य विषय म्हणून भौतिकशास्त्र किंवा रसायन शास्त्र किंवा जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणी शास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केली असेल अशा उमेदवारांमधून नामनिर्देशन आ द्वारे नेमणूक करण्यात येईल 


(परंतु हाफकिन संस्थेच्या वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ शास्त्रांमध्ये पदविका धारण करणाऱ्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल)

आरोग्य सेवक पुरुष

वेतन बँड 5200-20200 ग्रेड पे 2400

विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार ज्यांनी बहुद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा बारा महिन्यांचा मूलभूत अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांना नियुक्ती नंतर असे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहील 

आरोग्य सेवक पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी

वेतन बँड 5200-20200 ग्रेड पे 2400

विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून 90 दिवसांचा फवारणी कामाचा अनुभव आवश्यक.


ज्यांनी बहुपेशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा बारा महिन्यांचा मोफत अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारांनी नियुक्तीनंतर असे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहील.

आरोग्य सेवक महिला

वेतन बँड 5200-20200 ग्रेड पे 2400

ज्यांची अहर्ता प्राप्त सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषद मध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेले असेल किंवा अशा नोंदणी साठी जे पात्र असतील 

विस्तार अधिकारी कृषी

वेतन बँड 9300-34800 ग्रेड पे 4200

जे उमेदवार सांविधिक विद्यापीठाची कृषी विषयातील पदवी किंवा इतर कोणतीही समतुल्य अर्हता धारण करत असतील अशा उमेदवारांना म्हणून नेमणूक करता येईल.


कृषी कामाची उच्च शैक्षणिक अहर्ता व कृषी कामाचा अनुभव प्राप्त केला असेल किंवा सुधारित कृषीचा ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव असेल अशांना प्राधान्य देण्यात येईल.

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

वेतन बँड 5200-20200 ग्रेड पे 2400

माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाच्या एक वर्षाचा अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार किंवा संविधिमान्य तत्सम खालील पाठ्यक्रम 

  1. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या एक वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा

  2.  आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन वास्तुशास्त्रीय आरेखक किंवा

  3.  कंस्ट्रक्शन सुपरवायझर बांधकाम पर्यवेक्षक

  4.  सैनिकी सेवेतील बात का पर्यवेक्षिका चे अनुभव प्रमाणपत्र किंवा

  5.  स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदविका पदवी पदव्युत्तर पदवी स्थापत्य मध्ये धारण करीत असणारे उमेदवार पात्र असतील.

परंतु ज्यांनी 1980-81 ते 1986-87 च्या दरम्यान तंत्र शिक्षण विभागाच्या शासकीय तांत्रिक संस्थेकडून घेण्यात येणारी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांची एक वर्ष मुदतीची पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे अशा उमेदवारांच्या बाबतीत शासकीय तंत्र शिक्षण विभागाकडील त्यांच्या प्रमाणपत्राच्या पडताळणीच्या अधीन राहून वयोमर्यादा 47 वर्षे इतकी शितील करता येईल.

पशुधन पर्यवेक्षक

वेतन बँड 5200-20200 ग्रेड पे 2400

दोन संविधिक विद्यापीठाची पशुवैद्यक शास्त्रातील पदवी धारण करीत असलेल्या व्यक्ती किंवा पशुधन पर्यवेक्षक पशुपाल पशुधन सहाय्यक सहाय्यक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी बस श्रेणी याबाबतची पशुसंवर्धन संचालनालयाने दिलेली पुढील पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणाऱ्या व्यक्ती.

  1. त्यावेळच्या मुंबई राज्याने चालविलेल्या अभ्यासक्रमासह पशुवैद्यक पशुपालन प्रशिक्षण अभ्यासक्रम

  2.  पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन आणि राज्यातील विविध संवेदी कृषी विद्यापीठे आणि त्यांनी चालविलेल्या पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम

  3.  पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांनी चालविलेल्या पशुवैद्यक व पशुसंवर्धन शास्त्रांमधील दोन वर्षाचा सेवांतर्गत पदविका अभ्यासक्रम आणि

  4.  खालील संस्थांनी चालविलेल्या पशुवैद्यकीय शास्त्र विषयाचा दुग्धशाळा व क्षेत्र व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका यामधील दोन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम,

वरिष्ठ सहाय्यक लेखा

वेतन बँड 5200-20200 ग्रेड पे 2400

मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील याबाबत लेखक शास्त्र व लेखा परीक्षा ही विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणाऱ्या अथवा पहिल्या किंवा दुसऱ्या वर्गातील पदवी धारण करणाऱ्या अथवा कोणत्याही सरकारी कार्यालयात अथवा व्यापारी संस्थेत अथवा स्थानिक प्राधिकरणात तीन वर्षाहून कमी नसेल तितकी अखंड कालावधीपर्यंत लेखा विषयक कामाचा पदवीनंतरच्या प्रत्यक्ष अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती दिली जाईल.

अंगणवाडी पर्यवेक्षिका सरळ सेवा

वेतन बँड 9300-34800 ग्रेड पे 4100

ज्या महिला उमेदवारांनी एखाद्या संविधिक विद्यापीठाची खासकरून समाजशास्त्र किंवा गृह विज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील स्नातक ही पदवी धारण केलेली असेल 

वरिष्ठ सहाय्यक लिपिक

वेतन बँड 5200-20200 ग्रेड पे 2400

संविधिक विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील अशा उमेदवारांमधून नामनिर्देशन ना द्वारे नाम नेमणूक करण्यात येईल.

कनिष्ठ सहायक लिपिक

वेतन बँड 5200-20200 ग्रेड पे 1900

माध्यमिक शालांत परीक्षा अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांची मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त शासकीय परीक्षा विभाग शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी मराठी 30 टंकलेखनाचे शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे आणि अनिवार्य राहील 

कनिष्ठ लेखाधिकारी

वेतन बँड 9300-34800 ग्रेड पे 4200

ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली असेल व कोणतेही सरकारी कार्यालय व्यापारी भागीदार संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यातील किमान पाच वर्षाचा अखंड सेवेचा ज्यांना अनुभव असेल अशा उमेदवारांमधून नामनिर्देशन आ द्वारे नेमणूक करण्यात येईल या बाबतीत लेखक शास्त्र आणि लेखापरीक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणाऱ्यांना अथवा प्रथम व द्वितीय वर्गातील पदवी धारण करणाऱ्यांना अधिक पसंती दिली जाईल किंवा गणित अथवा सांख्यिकी अथवा लेखाशास्त्र व लेखापरीक्षा हे प्रमुख विषय घेऊन पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील अशा उमेदवारांमधून नामनिर्देशन आ द्वारे नेमणूक करण्यात येईल या बाबतीत कोणत्याही सरकारी कार्यालयातील अथवा व्यापारी संस्थेतील अथवा स्थानिक प्राधिकरणातील लेखा कार्याचा अनुभव असणाऱ्या अधिक पसंती दिली जाईल 

विस्तार अधिकारी सांख्यिकी 

वेतन बँड 9300-34800 ग्रेड पे 4200

समविधी मान्य विद्यापीठाची विज्ञान कृषी वाणिज्य किंवा वांग्मय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयात प्रथम सागर द्वितीय वर्गातील पदवी धारण करत असतील किंवा त्यांना नमुना सर्वेक्षण करण्याचा अनुभव असेल किंवा पदवी व अनुभव दोन्ही असतील अशा उमेदवारांमधून नामनिर्देशन आ द्वारे नेमणूक करण्यात येईल परंतु गुप्त विषयांपैकी एका विषयाची स्नातकोत्तर पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल 

कनिष्ठ यांत्रिकी 

वेतन बँड 5200-20200 ग्रेड पे 1900

ज्यांनी तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील अल्प मुदतीचा पाठ्यक्रम पूर्ण केला असेल किंवा जय समतुल्य अर्हता धारण करीत असतील असे उमेदवार आणि रोड मार्ग किंवा वाफेचे व तेलाचे रोड रोलर किंवा समतोल या गोष्टींचा दुरुस्तीचा चरणात कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव असेल असे उमेदवार 

वरील सर्व पदांसाठी आवश्यक सामायिक अहर्ता खालील प्रमाणे असेल.

सामायिक अहर्ता 

अहर्ता  तपशील 

संगणक अहर्ता 

MS-CIT किंवा CCC

लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र 

महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नियम 2005 मधील तरतुदीनुसार शासकीय सेवेतील भरतीमध्ये विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापत्र नियुक्ती वेळेस हजर होताना विवाहित उमेदवारांनी सादर करणे बंधनकारक राहील

 प्रतिज्ञापत्र नमूद केल्यानुसार ह्यात असलेल्या अपत्यांची संख्या दोन पेक्षा अधिक असेल तर दिनांक 28 मार्च 2006 व तदनंतर जन्माला आलेल्या व त्यामुळे उमेदवार शासकीय सेवेचा नियुक्तीसाठी अनर्ह ठरवण्यास पात्र होईल 


ZP Bharti 2019 | Application fees

परीक्षा फी

मागासवर्गीय उमेदवार

रु 250 /-

सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार

रु 500 /-

माझी सैनिक उमेदवारासाठी परीक्षा फी भरण्याची आवश्यकता नाही

--------


ZP Bharti 2019 | Age Limit

संवर्ग निहाय वयोमर्यादा
संवर्गाचे नाव कमीत कमी वयजास्तीत जास्त वय  (खुला)मागासवर्गीयांकरता
आरोग्य सेवक (महिला)184043
आरोग्य सेवक (पुरुष) ५०% फवारणी कर्मचारी184545

या शिवाय विहित मर्यादा कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही.


अर्ज शुल्क (Application Fee):


खुला :- ₹ 500/-

मागास प्रवर्ग:- ₹ 250/-

माजीसैनिक (Ex-Serviceman):- अर्ज फीस नाही.


ZP Bharti 2019 | Official website 2019

आधिकृत संकेत स्थल (Official Sites):

mahapariksha.gov.in


महत्वाचे दिनांक (Important Dates): -

Online अर्ज करण्यास सुरुवात दिनांक (Online start Date): 26/03/2019 (10:00 am) पासून. 

Online अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date): 16/04/2019 23.04.2019 (11:59 pm) पर्यंत होती


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area